PostImage

Pankaj Lanjewar

Aug. 31, 2023   

PostImage

शेतकऱ्यांना दिवसा सुरळीत विद्युत पुरवठा होईल यासाठी केला रास्ता रोको …


 धनच बु. सर्कल मधील धनज खुर्द बस स्थानक येथे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांच्या नेतृत्वात  शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करून महावितरण कंपनी ला वेठीस धरून  शेतीसाठी व्यवस्थित लाईन पुरवठा मिळावा भारणीयमन कमी करावे माळेगाव येथील सब स्टेशनचे काम तातडीने सुरू करावे शेतीसाठी विद्युत पुरवठा दिवसा मिळावा संदर्भात इतर मागण्यासह धनज खुर्द बस स्टॉप वरती रास्ता रोको करून  तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला आटोक्यात आणण्याकरिता धनज पोलीस स्टेशन येथील  पीएसआय योगेश इंगळे यांच्या नेतृत्वात सर्व पोलीस कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी या आंदोलनाला उपस्थिती दर्शवून या आंदोलनाच्या मागण्या उपअभियंता राजपुत साहेब महावितरण कंपनी कारंजा यांनी लेखी स्वरूपात आश्वासन देवुन  शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा केल्या जाईल व विद्युत पुरवठा खंडित झाल्यास तेवढाच विद्युत पुरवठा वेळ वाढवुन देऊन शेतकऱ्यांना पूर्ण काळ दिवसाविद्युत पुरवठा  सुरळीत देण्यात येईल असे लेखी आश्वासन राजपूत साहेब व कटके साहेब यांनी पूर्व वत व सुरळीत देण्यात येईल असे लेखी आश्वासन राजपूत साहेब व कटके साहेब यांनी या आंदोलनाचे प्रणेते श्री चंद्रशेखर डोईफोडे यांना लेखी स्वरूपात दिले त्यामुळे  धनज जिल्हा परिषद सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर डोईफोडे यांचे सर्व विभागीय स्तरातून कौतुकांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे या आंदोलनात प.सद्स्य मयूर मस्के, उमेश बोरेकर, निलेश टेकाडे, अंकुश भेंडे सरपंच ,प्रमोद साठोडे,सरपंच धनराज खिराडे सरपंच,शिशिर ठाकरे, नितीन ठाकरे,निलेश जाधव,अमोल घेटे प्रमोद बोथरा,जयेश बोथरा, रोशन ठाकूर,संजय गुल्हाने,आदी सह शेकडो शेतकरी उपस्थिती होते.